Ajay Bagul
sakal
नाशिक: विसेमळा परिसरातील गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित व भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल याच्यासह तिघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. दोन आठवड्यांपासून अजय बागूल परराज्यात पसार झाला असता, त्याच्या मागावर असलेल्या युनिट एकच्या पथकाने त्यास कर्नाटकातून अटक केली आहे. दरम्यान, तिघांना न्यायालयात हजर केले असता, शुक्रवार (ता. १७)पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.