Devendra Fadnavis
sakal
नाशिक: विश्व मराठी संमेलनाच्या चौथ्या पर्वात नाशिकनगरीत मराठी भाषेचा उत्सव रंगला आणि नवतंत्रज्ञानाच्या साक्षीने मराठीच्या भविष्यास नवे वळण देण्याचा संकल्प व्यक्त झाला. राज्यातील शाळांमध्ये मराठी सक्तीची असताना काही ठिकाणी ती प्रभावीपणे शिकविली जात नसल्याची खंत व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) सहाय्याने भाषा प्रयोगशाळा उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग सुरू असल्याची घोषणा केली.