धुळे : टुडे पान ४ साठी..
--
फोटो क्रमांक : 33648
बोरकुंड (ता. धुळे) : महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त विश्वकर्मा सभामंडपाच्या भूमिपूजनवेळी उपस्थित आमदार राम भदाणे. शेजारी बापू खलाने, बाळासाहेब भदाणे, प्रा. अरविंद जाधव आदींसह पदाधिकारी.
--
बोरकुंडला विश्वकर्मा सभामंडपाचा श्रीगणेशा
--
आमदार भदाणे यांच्या हस्ते भूमिपूजन; मान्यवरांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ : बोरकुंड (ता. धुळे) येथे महर्षी वाल्मीकी जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या विश्वकर्मा मंदिर सभामंडपाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या हस्ते या विकासकामांचे भूमिपूजन पार पडले.
आमदार भदाणे यांच्या हस्ते महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सरचिटणीस बाळासाहेब भदाणे, संघटन सरचिटणीस भाऊसाहेब देसले, माजी सभापती प्रा. अरविंद जाधव, माजी उपसभापती विद्याधर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर भदाणे, संदीप देसले, सरपंच रावसाहेब भदाणे, प्रभारी सरपंच हितेश पारीख, रतनपुरा सरपंच सुनील चौधरी, विंचूर सरपंच बाळासाहेब देसले, तिखी सरपंच श्रीराम पाटील, नाणेचे माजी सरपंच अजय राजपूत, माजी सरपंच राजेंद्र मराठे, विकास सोसायटीचे गंगाधर माळी, भरत भदाणे, रवींद्र भदाणे, सुधीर मिस्तरी, राजू मिस्त्री, प्रमोद देवरे, लक्ष्मण देवरे, भानुदास देवरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. आमदार भदाणे, जिल्हाध्यक्ष खलाणे, प्रा. जाधव, सरचिटणीस भदाणे, श्री. देसले यांनी गावाच्या विकासाविषयी भूमिका मांडली.