NSK26H32891
जळगाव : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देताना आमदार सुरेश भोळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, संजय बी. विसपुते, विश्वकर्मा सेलचे पदाधिकारी.
---------
विश्वकर्मा योजनेच्या अडचणी सोडवा
---
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : प्रधानमंत्री विकर्मा योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्या व शहरात अधिकृत प्रशिक्षण केंद्र सुरू करा, अशा मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पक्ष जळगाव महानगर जिल्हा विश्वकर्मा सेलच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देण्यात आले.
आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कोषाध्यक्ष विजय वानखेडे यांच्या उपस्थितीत विश्वकर्मा सेलचे महानगर जिल्हाध्यक्ष संजय विसपुते यांनी हे निवेदन दिले.
.......
प्रशिक्षण केंद्राची मागणी
विश्वकर्मा योजनेच्या जिल्हा समितीची बैठक दोन वर्षांपासून न झाल्याने ती तातडीने गेण्याची मागणी निवेदनात केली आहे. योजनेसाठी अधिकृत प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करून अर्जांची प्रक्रिया सुरळीत करावी, अर्जांतील त्रुटींमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र अर्जदारांच्या अडचणी सोडवाव्यात. प्रशिक्षण पूर्ण करूनही लाभ न मिळालेल्या व प्रतीक्षायादीतील पात्र उमेदवारांसाठी विशेष मेळावा घेण्याची मागणीही केली आहे.
.......
साधनसामग्रीचा लाभ द्या
योजनेअंतर्गत पात्र महिलांना शिलाई यंत्र, नियमानुसार व्यवसायासाठी आवश्यक साधनसामग्रीचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाने कार्यवाही करावी. संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा, त्यावर निश्चित कालमर्यादेत निर्णय घ्यावा, अशीही मागणी आहे. यावेळी विश्वकर्मा सेलचे महानगर जिल्हा उपाध्यक्ष महेश वर्मा, संजय जगताप, संजय दीक्षित, अशोक शिंपी, संदीप डोलारे, विजय शेवाळे, चंद्रकांत पंधारे, संजय पगार, योगेश सोनवणे, विनोद सोनार, गणेश सोनी यांच्यासह सेलचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.