विटाई शाळा उपक्रम

विटाई शाळा उपक्रम
Published on: 
धुळे : टुडे पान ३ साठी... --- फोटो क्रमांक : 35186 विटाई (ता. साक्री) : जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या आर्थिक योगदानातून व लोकसहभागातून कार्यान्वित करण्यात आलेल्या सीसीटीव्ही सुरक्षा रक्षक प्रणालीचे उद्‍घाटन करताना ॲड. गौरव भामरे. शेजारी मान्यवर. --- विटाई शाळेला लाभले सीसीटीव्ही सुरक्षाकवच कौतुकास्पद उपक्रम : लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत सुरक्षा प्रणाली कार्यान्वित सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ : शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधांचा विकास आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी विटाई (ता. साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेत एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला. माजी विद्यार्थी संघ आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून सढळ हाताने दिलेली आर्थिक मदत यांच्या जोरावर शाळा व परिसरासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही सुरक्षा रक्षक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. दीपोत्सव पर्वाच्या मुहूर्तावर झालेल्या कार्यक्रमात या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेचे औपचारिक उद्‍घाटन पार पडले. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ॲड. गौरव भामरे यांच्या हस्ते फिती कापून या प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला. शिवछत्रपती युवा फाउंडेशनचे पदाधिकारी डॉ. नीलेश खैरनार, वाल्मीक खैरनार, प्रशांत खैरनार, शाळेचे मुख्याध्यापक अरुण खैरनार उपस्थित होते. शाळेसाठी निधी व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, तसेच शिक्षकांनी सर्व दात्यांचे आभार मानले. कासारे बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी जितेंद्र भामरे, नाडसे केंद्राचे केंद्र समन्वयक बाबासाहेब बडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. माजी विद्यार्थी संघाच्या या पुढाकारामुळे केवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मदत झाली नाही, तर ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये लोकसहभाग कसा आदर्श ठरू शकतो, याचे आदर्शवत उदाहरण विटाई शाळेने घालून दिले आहे. शाळेच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे पाऊल जिल्ह्यात कौतुकास्पद ठरत आहे. --- १४-१ चौकट शाळेसाठी यांचे सहकार्य विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विटाई गावातील दानशूर व्यक्ती, माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या आर्थिक सहकार्यातून प्रत्यक्षात आला. यात प्रामुख्याने विटाईस्थित शिवछत्रपती युवा फाउंडेशन, निवृत्त अभियंता संजय खैरनार, साक्री बाजार समितीचे संचालक नंदकुमार  खैरनार, शिवसेना युवती सभेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य प्रियंका जोशी, प्राथमिक शिक्षक प्रा. डॉ. नरेंद्र खैरनार, प्राथमिक शिक्षक गौतम साळवे, ॲड. गौरव भामरे यांनी सढळ हाताने आर्थिक योगदान दिले. या सर्व दात्यांच्या योगदानामुळे शाळेतील चिमुरड्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मार्ग सुकर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.