विवेकानंद केंद्राच्या
प्राणायाम सत्राचा समारोप
मालेगाव शहर, ता. २९ : येथील विवेकानंद केंद्राची मालेगाव शाखा व लिंगायत संघर्ष समितीतर्फे पाचदिवसीय प्राणायाम सत्र संगमेश्वरातील लिंगायत समाज मंगल कार्यालयात झाले. प्राणायाम सत्राचा समारोप भारतमाता पूजनाने झाला.
विवेकानंद केंद्राच्या देवगिरी विभागाचे प्रमुख विश्वास देवकर, महाराष्ट्र व गोवा प्रांताच्या संघटक सुजाता दळवी यांनी योगसाधकांना शिथिलीकरण, अष्टांगयोग, श्वासाचे व्यायाम, जीवनदर्शन तत्व, प्राणायाम आणि शवासनादी आसने शिकविली. अनिलकुमार आघारकर, ज्ञानेश्वर भावसार, महेश अग्रवाल, स्वाती मराठे यांनी मार्गदर्शन केले. विद्या पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुरेश शास्त्री यांच्या शांतीमंत्राने प्रारंभ झाला. संजय पाठक यांनी प्रास्ताविक केले. लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुचित गोंधळे, मुकुंद शिरोडे, मीना भावसार वैशाली मराठे यांनी अनुभव कथन केले.
बन्सीलाल कांकरिया, डॉ. रमेश चोपडे, डॉ. उषा चोपडे , किशोर दत्ताणी, नारायण दत्ताणी, परमानंद जनानी, विजय पोफळे, डॉ. योगेश शास्त्री, भगवान कोष्टी आदी उपस्थित होते. प्राणायाम सत्राच्या यशस्वितेसाठी रमेश पाटील, विजय येवले, नितीन हिरे, निलेश अमृतकर , सुरेश गरुड, चंद्रशेखर कुलकर्णी, मृदुला महाशब्दे, आशिष बोहाडे, रूपाली पाखले, राघव जोशी, कुमार सुतवणी यांनी प्रयत्न केले.