नाशिक- जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत ८३ हजार ८१३ नवमतदार वाढले आहेत. तसेच, ३१ हजार ३२५ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. नव्याने नावनोंदणी केलेल्या मतदारांना वर्षाअखेरीस होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.