नाव नोंदविण्याची संधी

नाव नोंदविण्याची संधी
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी -- अंतिम मतदारयादीची ३० ला प्रसिद्धी - जिल्हाधिकारी : १३ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदविण्याची संधी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३० : लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असून, त्यासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल करून दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन मतदार यादीतील आपली नोंद तपासावी. आवश्यक असल्यास नाव नोंदणी, दुरुस्ती तसेच दावे व हरकती विहित मुदतीत दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे. - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १२ ऑक्टोबरच्या निर्देशानुसार मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी दावे व हरकती दाखल करण्यासाठी ९ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. आता ही मुदत वाढवून १३ नोव्हेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र नागरिकांना मतदारयादीतील नोंदी तपासून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध झाला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते १३ नोव्हेंबर २०२६ असा राहील. प्राप्त दावे व हरकतींची नोटीस प्रक्रिया, सुनावणी व निकाली काढण्याची कार्यवाही २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्हाधिकारी विसपुते यांनी सांगितले, की मतदार यादी अचूक व अद्ययावत राहण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. पात्र नागरिकांचे नाव यादीत नसल्यास किंवा विद्यमान नोंदीमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास विहित प्रक्रियेनुसार अर्ज करावा. तसेच मतदार यादीसंदर्भातील दावे व हरकती निश्चित मुदतीत दाखल कराव्यात. मतदार यादीतील अचूक नोंद ही प्रभावी लोकशाही सहभागाची पहिली पायरी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी अंतिम तारखेची वाट न पाहता आपली नोंद तपासून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. विशेषतः प्रथमच मतदार म्हणून पात्र ठरणाऱ्या युवक-युवतींनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.