voting awareness
sakal
नाशिक: देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना मतदानाबद्दल आजही सर्वसामान्यांमध्ये उदासीनता दिसून येते. नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत ५७ टक्के मतदानाची नोंद झाली. २००९ पासून आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ३५ टक्के मतदार हे त्यांच्या मतदानाचा हक्क बजावत नसल्याचे समोर आले आहे. सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने हे चिंताजनक आहे.