Lasalgaon Merchant Bank Election: लासलगाव मर्चंट बँकेसाठी 31 ला मतदान; दोन पॅनलमध्ये सरळ लढतीची शक्यता

Merchant Bank Building
Merchant Bank Buildingesakal

लासलगाव : लासलगाव मर्चंट को-ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल वाजला असून, ३१ डिसेंबरला १९ जागांसाठी मतदान होणार आहे.

मतमोजणी १ जानेवारीला होणार असून, एकूण १६ हजार ५०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत विघ्ने यांनी दिली. (Voting for Lasalgaon Merchant Bank Election on 31st Chances of straight fight between two panels nashik)

१४ जागा सर्वसाधारण जनरल, दोन महिला प्रतिनिधी, एक भटक्या विमुक्त जाती, एक इतर मागासवर्ग, एक जागा अनुसूचित जाती-जमातीसाठी असून, एकूण १९ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. बुधवारी (ता. ६) अर्जांची छाननी होणार आहे. गुरुवारी (ता. ७) नामनिर्देशक पत्रांची सूची प्रसिद्ध होईल. ७ ते २१ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत अर्ज माघारी घेता येतील.

२२ डिसेंबरला अंतिम यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. ३१ डिसेंबरला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होईल. १ जानेवारी २०२४ ला मतमोजणी होईल. आजपर्यंत सर्वसाधारण गटात सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

त्यात प्रामुख्याने विद्यमान संचालक अजय ब्रह्मेचा, अशोक गवळी, सचिन मालपाणी, ओमप्रकाश राका, पारसमल ब्रह्मेचा, हर्शद पानगव्हाणे, संदीप होळकर यांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती- जमातीमधून एक अर्ज विद्यमान व्हाईस चेअरमन राजेंद्र घोलप यांनी दाखल केला आहे. भटक्या विमुक्त जातीमधून किसन दराडे यांनी, तर इतर मागासवर प्रवर्गामधून सोमनाथ शिरसाट, महिला प्रतिनिधी गटातून वेदिका होळकर यांनी अर्ज दाखल केला आहे.

Merchant Bank Building
Nashik Water Crisis: उन्हाळ्यात पाणीटंचाईचा होणार विस्फोट! येवल्यात 91 गावे-वाड्यावर टँकरची आवश्यकता

मागील पंचवार्षिक निवडणुकीत १७ जागांसाठी सहकार व नम्रता पॅनल यांच्यात काट्याची लढत झाली होती. त्यात नऊ जागेवर सहकार पॅनल व आठ जागेवर नम्रता पॅनलचे उमेदवार निवडून आले होते.

त्यावेळी नम्रता पॅनलचे नेतृत्व अजय ब्रह्मचा, अशोक गवळी यांनी, तर नम्रता पॅनलचे नेतृत्व डी. के. जगताप, संतोष पलोड, प्रकाश दायमा यांनी केले होते.

इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे दोन पॅनलमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे. इच्छुकांच्या जादा संख्येमुळे पॅनलची निर्मिती करताना नेत्यांची दमछाक होणार आहे.

उमेदवारी अर्ज भरताना एक लाख रुपये डिपॉझिट व दहा हजारांचा शेअर्स ही अट असल्याने बऱ्याच गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

अर्ज भरणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, अखेरच्या दोन दिवसांत किती उमेदवार अर्ज दाखल होतात, यावरच पॅनलची संख्या निश्चित होणार आहे.

Merchant Bank Building
Nashik: संगणकाच्या शटडाऊनमुळे गावांची मंदावली गती; ग्रामपंचायतमधील संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन सुरूच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com