वयात आले की प्रत्येकाच्या मनात प्रेमाची पालवी फुटतेच. तशी पालवी एकाच गावातील, नात्यातल्याच दोघांमध्ये बहरली. प्रेमाच्या आणा-भाका घेतल्या गेल्या. घराच्यांचा विरोध असतानाही एकमेकांना भेटणे सोडले नाही. ती सतराव्या वर्षीच गर्भवती राहिली. अखेर दोघांनी ‘प्रेम अमर’ करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. नदीवरचा पूल गाठला अन् तू का मीच्या नादात तो मरणाला घाबरला अन् तिला नदीत ढकलून पसार झाला...
सत्यजित आमले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नाशिक तालुका पोलिस ठाणे. (तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक, सावर्डे पोलिस ठाणे, रत्नागिरी)