सिंहस्थासाठी वडाळा ३० मीटर रस्त्याच्या कामाला गती

सिंहस्थासाठी वडाळा ३० मीटर रस्त्याच्या कामाला गती
Published on: 
टूडे साठी -------------- वडाळा ३० मीटर रस्त्याच्या कामाला गती सिंहस्थासाठी भूसंपादनासाठी महासभेकडे प्रस्ताव सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : कुंभमेळ्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिकेने वडाळा परिसरातील महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. लेखानगर ते एनएच-३, कलानगर चौक, वडाळा गाव, रविशंकर मार्ग आणि विजय ममता चौक या पट्ट्यातून जाणाऱ्या ३० मीटर रुंदीच्या प्रस्तावित रस्त्याच्या कामासाठी आता प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या असून या मार्गात येणारी खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी नगररचना विभागाने महासभेची परवानगी मागितली आहे. शहराची पहिली विकास योजना १९९३ मध्ये, तर सुधारित विकास योजना २०२० मध्ये मंजूर झाली असून त्यात वडाळा शिवारातील सर्वे क्रमांकांमधून हा ३० मीटरचा रस्ता दर्शविण्यात आला आहे. सध्या या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. विशेषतः विजय ममता थिएटरजवळ नाशिक-पुणे रस्त्याला मिळणाऱ्या चौकात कुंभकाळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण आणि योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी चौकाजवळील सुमारे १ हजार ५४ चौरस मीटर क्षेत्र संपादित करावे लागणार आहे. ---चौकट वाटाघाटीतून जागा घेण्याचा प्रयत्न या जागेचे टीडीआर घोषणापत्र अद्याप तयार झालेले नसल्याने सुरुवातीला जागामालकांशी चर्चा करून सामंजस्याने आणि खासगी वाटाघाटीतून जागा घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाटाघाटीला प्रतिसाद न मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून नियमानुसार जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. महासभेची मान्यता बंधनकारक असल्याने हा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला आहे. ---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.