वडाळा डीजीपी रोडवरील अतिक्रणावर चालला जेसीबी

वडाळा डीजीपी रोडवरील अतिक्रणावर चालला जेसीबी
Published on: 
फोटो : A14956 वडाळा : डीजीपीनगर मार्गावरील शासकीय जागेवरील जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केलेले अतिक्रमण - वडाळा शिवारातील अतिक्रमण जमीनदोस्त लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पवित्र्यानंतर मनपाची धडक कारवाई सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. ५ : पूर्व विभागाची नुकतीच झालेली सभा अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजली. नगरसेवकांनी अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांवर आरोप करत त्यांना धारेवर धरले. त्यानंतर पथकाने ॲक्शन मोडमध्ये येत सोमवारी (ता. ५) वडाळा शिवार डीजीपीनगर रोड भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त केले. वडाळा परिसरातील डीजीपीनगर क्रमांक १ येथील सर्व्हे क्रमांक ४९-५० मधील शासकीय भूखंडावर अनधिकृत अतिक्रमण थाटण्यात आले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी धडक कारवाई करत संपूर्ण अतिक्रमण जमीनदोस्त केले. गॅरेज, राहते घर तसेच सर्व्हिस स्टेशनचे अतिक्रमण काढले. उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशाने पूर्व विभागीय अधिकारी आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण विभागाचे लिपिक गुणवंत वाघ, पथकप्रमुख सूर्यवंशी, प्रभाकर अभंग सुमारे २० कर्मचारी तसेच एनडीएसचे जवान यांच्याकडून कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, याच ठिकाणी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुमारे ३६ दुकानांचे मोठे अतिक्रमण हटवून शासकीय भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला होता. मात्र, कारवाईनंतर काही व्यावसायिकांनी पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. याबाबत प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारत तातडीने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा कारवाईचा बडगा उगारत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. शासकीय जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून पुढील काळातही लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अशाच प्रकारे पूर्व विभागाच्या इतरही भागात वाढलेले अनधिकृत अतिक्रमण काढण्यात यावे. अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com