सिमेंट मिक्सर ट्रक च्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

सिमेंट मिक्सर ट्रक च्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
Published on: 
पान तीन ------------------ 12949 वडाळा : अपघात स्थळी जमलेले नागरिक. सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी सकाळ वृत्तसेवा इंदिरानगर, ता.१९ : वडाळा शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या गॅस गोडाऊन भागात सोमवारी (ता.१९) सकाळी १० ला जय मल्हार कॉलनीमध्ये राहणारे अबीद हबीब खान (५५) हे दुचाकीवरून कामानिमित्त जात असताना सिमेंट मिक्सरच्या मोठ्या ट्रकने धडक दिल्याने जखमी झाले. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून खोदकामामुळे एकेरी करण्यात आलेला आणि अवजड वाहतुकीने मृत्यूचा सापळा बनलेला हा रस्ता पुन्हा चर्चेत आला आहे. सोमवारी सकाळी खान हे दुचाकीवर येत असताना गॅस गुदामच्या समोरून डावीकडे वळत असताना इंदिरानगर बाजूने येणाऱ्या सिमेंट मिक्सरच्या ट्रकने (एमएच १५ जेसी ३८४७) धडक बसली. त्यात त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने श्री खान अस्वस्थ झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक युवक सागर मोरे, कुर्बान शेख, सोनू अत्तार, मुजम्मिल शेख, सोनू बगदानी, मुश्ताक लालू आदींनी त्यांना दवाखान्यात नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ट्रक ताब्यात घेतला. ---------- कारवाईची मागणी दरम्यान या भागात विकास कामांना झालेल्या विलंबामुळे अपघात व इतर नुकसानीला संबंधित काम घेणारी कंपनी जबाबदार असल्याचा आरोप जय कोतवाल, ईश्वर पवार, दिशांत इनामदार आदींसह नागरिकांनी करत संबंधित कंपनीची सखोल चौकशी करून ही कंपनी आणि त्यांचे अधिकारी जर दोषी आढळले तरी या कंपनीवर कारवाई करत काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.
Marathi News Esakal
www.esakal.com