VDG26A03217
वडांगळी (ता. सिन्नर) ः येथील निमसे परिवारातील महिलेची सोन्याची पोत लुटणाऱ्या सराईत चोराला पकडल्याबद्दल सायखेडा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर आव्हाड यांचा सत्कार करताना राहुल खुळे, किशोर गडाख. आबा गडाख.
-----------------------
३६-२
महिलेची पोत चोरणाऱ्या
सराईताला अखेर अटक
--------------
कामगिरीबद्दल पोलिसांचा सत्कार
-------------
सकाळ वृत्तसेवा
वडांगळी, ता.९ ः येथील शिवारात निमगाव- सिन्नर रस्त्यालगत दुचाकीमागे बसलेल्या महिलेची तीन तोळ्यांची सोन्याची पोत लुटणाऱ्या सराईत चोराला सायखेडा पोलिसांनी पकडले आहे. चोरट्यांकडून युनिकाॅर्न दुचाकी, तीन मोबाईल व पन्नास ग्रॅम वजनाची सोन्याची लगड पोलिसांनी जप्त केली आहे. सायखेडा पोलिसांनी सचिन सुदाम ढेपले (४०, ढेपले वस्ती, नांदुरी रोड निफाड) या सराईत चोरट्याला ताब्यात घेतले आहे, त्याने वडांगळीच्या गुन्हाची कबूल दिली आहे असे पोलिसांनी सांगितले.
गुरुवारी (ता.२९) वडांगळीचे प्रगतिशील शेतकरी मोतीराम निमसेस मालती निमसे दुचाकीने येत असताना सोन्याची पोत चोरली आहे. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हिवरगाव टोमॅटो मार्केट परिसरात नेहमीत हा चोरटा नजरेस पडत आहे. युनिकाॅर्न दुचाकी ही विनाक्रमांकाची होते. स्थानिक शेतकरी बांधवांनी दोन तीन वेळा पाठलाग केला होता, मात्र त्याने पळ काढला होता. मध्यंतरी खडांगळीत ज्येष्ठ महिलेची सोन्याची पोतही यानेच चोरली आहे असे ग्रामस्थांनी सांगितले. सायखेडा पोलिसांनी तात्काळ सापळा रचल्यामुळे चोर हाती लागला आहे. सायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर आव्हाड, हवालदार मंगेश गोसावी यांचा सत्कार निमसे परिवाराने केला आहे. वडांगळीचे माजी सरपंच राहुल खुळे, प्रवीण निमसे, किरण निमसे, किशोर गडाख, आबा गडाख, दीपक वारूंगसे उपस्थित होते.