वाडीवऱ्हे- स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखेने व वाडीवऱ्हे पोलिसांनी गुन्हे करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या चौघांना अटक केली. नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या चोऱ्या, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांची माहिती काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांचे पथक सक्रिय आहे.