वाडीवऱ्हे: वाडीवऱ्हे- आहुर्ली रस्त्यावरील भंबाळा फाटा (मुरंबी शिवार) येथील पेट्रोल पंपावर कोयत्याने मारहाण करीत जबरी लूट करणाऱ्या तिघा संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. संशयितांकडून इतर चोरीच्या गुन्ह्यांची देखील माहिती मिळाली आहे. चार दिवसात या चोरीचा शोध लावणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे.