वडनेरभैरव- एकेकाळी पानमळे हीच ओळख असलेल्या वडनेर भैरव येथे सध्या द्राक्षांच्या बागा वाढल्या आहेत. पानवेली अपवाद म्हणूनच उरल्या आहेत. वडनेर भैरव हे गाव जिल्ह्यात नव्हे तर राज्यात पान बागायतदार म्हणून ओळख होती. पण सध्या तरुण पिढीने पानवेलीकडे पाठ फिरविली असली तरी, तब्बल वीस वर्षाची एक पानवेलीची बाग येथील एक ज्येष्ठ सांभाळत आहेत.