फोटो : H33245
गंगापूर रोड : गांधी शिल्प बाजार येथे आयोजित वॉक विथ खादी उपक्रमास उपस्थित मान्यवर.
---
गांधी शिल्प बाजारमध्ये वॉक विथ खादी’
खादी वेशभूषेतील रॅम्प वॉकने वेधले लक्ष, विजेत्यांना बक्षीस
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : गंगापूर रोडवरील चोपडा बँकेट हॉल येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय गांधी शिल्प बाजार प्रदर्शनात ‘वॉक विथ खादी’ उपक्रमात प्रमुख अतिथी, मान्यवरांनी खादीचे आकर्षक वस्त्रे परिधान करून रॅम्प वॉक करत उपस्थितांची दाद मिळवली. या उपक्रमातील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमासाठी केंद्र सरकारचे वस्त्र मंत्रालय व विकास आयुक्त कार्यालय, हस्तशिल्प यांचीही साथ लाभली. स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या संस्थापिका संचालक दीपाली चांडक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मारवाडी युवा मंचच्या माजी उपाध्यक्ष सुरुची पोद्दार यांनी गांधी शिल्प बाजाराची रूपरेषा मांडली. यानंतर स्वयंमशक्तीच्या प्रकल्प प्रमुख सोनल विजयवर्गीय यांनी ‘वॉक विथ खादी’ या संकल्पनेची माहिती दिली. खादी आणि ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्याचे राज्य संचालक योगेश भामरे यांनी विचार मांडताना खादीच्या प्रसारावर भर दिला. नगरसेविका स्वाती भामरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विविध स्पर्धक व उपस्थितांनीही खादीच्या वेशभूषेत वॉक केला. स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे २२ जणांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन रोहन मेहता यांनी केले.