प्रमोद महाजन उद्यानाची भिंत कोसळली | latest marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Part of the protection wall of Pramod Mahajan Udyan collapsed on the road

प्रमोद महाजन उद्यानाची भिंत कोसळली

नाशिक : गंगापूर रोड येथील प्रमोद महाजन उद्यानाची भिंत कोसळण्याची घटना सायंकाळी घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उद्यान विभागाचे कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेसीबीच्या साह्याने भिंतीचा कोसळलेला भाग बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला. (wall of Pramod Mahajan Park collapsed Nashik Latest Marathi News)

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी (ता .४) सायंकाळी शहरात मुसळधार पाऊस झाला. वाऱ्यासह जोरदार पाऊस असल्याने प्रमोद महाजन उद्यानाची मागील बाजूची संरक्षण भिंत रस्त्यावर कोसळली. या रस्त्यावर नेहमी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.

सुदैवाने रस्त्यावर वाहने नव्हती. त्यामुळे दुर्घटना टळली. महापालिका उपायुक्त श्री. मुंडे यांनी घटनास्थळी पाहणी केली. अग्निशामक विभागास माहिती मिळताच फायरमन इसाक शेख, शिवाजी फुगट, भीमाशंकर खोडे, हेमंत बेळगावकर, महेश कदम यांनी घटनास्थळी दाखल होऊन उद्यान विभागाच्या मदतीने आणि जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला.

भिंतीचा अन्य काही धोकादायक काढून घेण्यात आला. दोन दिवसांपूर्वी रविवार कारंजा येथील रेड क्रॉस सिग्नल परिसरातील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या घरकुल इमारतीचा भाग कोसळण्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ गुरुवारी महापालिकेच्याच उद्यानाची संरक्षण भिंत कोसळण्याचा प्रकार घडला.

टॅग्स :Nashikparkpramod mahajan