३६-२
वांगणीत आश्रमशाळांच्या
केंद्रस्तरिय क्रीडा स्पर्धा
तालुक्यातील अठरा शाळांचे संघ सहभागी
------------
सकाळ वृत्तसेवा
पेठ, ता.१७ : वांगणी (पेठ) येथील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच झाल्या. शाळा समितीचे प्रमुख तथा कुंभाळेचे सरपंच मोहन कामडी यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. सरपंच संजय फुफाणे, शिक्षण विस्तार अधिकारी चंदनशिवे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. एकूण १८ आश्रमशाळांमधील क्रीडापटूंनी विविध क्रिडा प्रकारात सहभाग घेतला.
स्पर्धेतील विजयी आश्रमशाळा संघ असे ः १४ वर्षाखालील खो-खो ः वांगणी, १९ वर्ष व्हॉलिबॉल ः वांगणी, १७ वर्षे खो-खो ः वांगणी. १९ वर्षे खो-खो ः आसरबारी. १९ वर्षे टॅन्डबॉल ः आसरबारी. १४ वर्षे, व्हॉलिबॉल ः निरगुडे. १७ वर्षे, व्हॉलिबॉल ः निरगुडे. १९ वर्षे व्हॉलिबॉल ः वांगणी. १४ वर्षे, कबड्डी ः बाडणी. १७ वर्षे, कबड्डी ः बोखठ. कबड्डी ः आसरबारी. १४ वर्षे, हॅन्डबॉल ः खरपडी.१७ वर्षे, हॅन्डबॉल ः आसरखारी. स्पर्धा यशस्वितेसाठी प्राचार्य सी. पी. कुवर, मुख्याध्यापिका श्रीमती दळवी, सुभाष वळवी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला डी. आर. अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. चव्हाण यांनी आभार मानले.
--------------