वणी पोलिसांची धडक कारवाई; गुटख्यासह 39 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त | Wani Police Strike Action Goods worth 39 lakh 34 thousand including Gutkha seized Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime: वणी पोलिसांची धडक कारवाई; गुटख्यासह 39 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : वणी - पिंपळगाव बसवंत रस्त्यावरील जऊळके शिवारात अवैध गुटखा वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडून १९ लाख २४ हजाराचा गुटखा, २ लाख १० हजाराचा पास्तासह ३९ लाख ३४ हजाराचा ऐैवज वणी पोलिसांनी जप्त केला आहे. (Wani Police Strike Action Goods worth 39 lakh 34 thousand including Gutkha seized Nashik Crime)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

शुक्रवार, ता. २२ रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान वणी पोलिस स्टेशन कर्मचारी ग्रस्तीवर असतांना मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे वणी बाजूकडून पिंपळगावकडे एक आयशर वाहन गुटखा घेवून जात असल्याची माहिती मिळाली.

यावेळी भरधाव वेगात जाणारे आशर वाहन पोलिसांना दिसले. याबाबत पोलिसांना संशय आल्याने वाहनाचा पाठलाग करत जऊळके वणी शिवारात पोलिसांनी सदरचे आयशर कंपनीचा 3015 मॉडेलचा 6 टायर मालट्रक क्रमांक डीडी-01 जी 9092 हे संशयीत वाहन थांबवले.

यावेळी पोलिसांनी वाहन चालक व क्लिनर यांची चौकशी केली असता उडवा उडवीचे उत्तर दिल्यानंतर वाहनात असलेल्या मालाची तपासणी केली असता सुमारे १५० गोण्या वाहनाच्या आजुबाजुस रचुन मध्ये गुटख्याचे खोके व पोते असल्याचे आढळून आला.

याप्रकरणी वणी पोलिसांनी मांगीलाल हरीसिंग डांगी, वय 25 वर्षे, (चालक) राहणार- बडवेली, जि. राजगड, मध्यप्रदेश राज्य, बने बाबुलाल सिंग, वय-33 वर्ष, (क्लिनर), रा.. बडागाँव, जि..शाजापुर मध्यप्रदेश राज्य यांच्यासह इंदोर मध्यप्रदेश राज्य येथील माल पाठविणारा (नाव नाही), विकी मंगलानी, डिलर अमरावती, शाकीब शेख, जुहु गल्ली, अंधेरी मुंबई, माल घेणारा, श्री. रॉयल ट्रान्सपोर्ट, इंदोर मध्यप्रदेश यांच्यावर वणी पोलिसांत अन्न सुरक्षा व मानके कायदा व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच वाहनातून प्रिमिअम राजनिवास, विमल कंपनीच्या विविध आकाराच्या पुड्यात असलेल गुटखा पानमसाला असा १९ लाख २४ हजाराचे गुटखा पानमसाला, सफेद रंगाच्या पास्ताच्या १५० गोण्या एकुण किमंत २ लाख १० हजार व १८ लाख किमंतीचे आयशर वाहन असा ३९ लाख ३४ हजाराचा ऐैवज पोलिसांनी जप्त केला आहे.

ग्रामिण पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अतिरीक्त सहाय्यक पोलिस अधिक्षत श्रीमती माधुरी कांगणे, कळवणचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे, पोलिस उपनिरीक्षत महेश शिंदे, पोलिस निलेश सावकार, युवराज खांडवी, बंडू हेंगडे, माधव साळे, विजय बछाव, राहुल आहेर यांनी कारवाई केली.