ration card
sakal
वणी: शहरात ‘जुने रेशनकार्ड बंद होणार असून, नवीन स्मार्ट रेशनकार्ड काढणे बंधनकारक आहे,’ अशी खोटी माहिती देऊन काही तरुणांनी रेशनकार्डधारकांची आर्थिक लूट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेशन दुकानांसमोर बसून हे तरुण नागरिकांकडून प्रत्येकी शंभर रुपये आकारून केवळ वहीत माहिती नोंदवत होते.