वणी: येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात रुग्णालयातील मुदतबाह्य औषध उघड्यावर टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रयत्न झाला. वणी ग्रामीण रुग्णालय नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. वैद्यकीय अधीक्षकाचे पद एक वर्षापासून रिक्त असून स्त्री रोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकाऱ्याची जागाही चार महिन्यांपासून रिक्त आहे. सध्याच्या वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. सोनाली गायधनींकडे एक प्रभारी अधीक्षक म्हणून जबाबदारी आहे.