नाशिक : सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच

bjp shivsena
bjp shivsenaesakal
Updated on

सुरगाणा (नाशिक) : येेथे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रभाग १६ मधून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका कासूबाई नागू पवार (रा. सुरगाणा वय ७५) यांचे वापी बलसाड (गुजरात) येथे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी नगरपंचायतीची राजकीय समीकरणे बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण यावरच सुरगाणा नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुक अवलंबुन असणार आहे.

कोणाची रणनिती ठरणार यशस्वी

सध्या भाजप ८, शिवसेना ६, माकप २, राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल आहे. या पैकी भाजपचे आता ७ सदस्य निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. भाजप ७, राष्ट्रवादी १ असे गणित जुळले तर ८, शिवसेना ६, माकप २ असे झाले तरीही ८ असे चित्र निर्माण होईल. महाविकास आघाडीचा विचार केल्यास शिवसेना, राष्ट्रवादी असे ७ होऊ शकतात. भाजपकडे ७ जागा असल्याने माकप नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. विद्यमान खासदार भारती पवार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, तालुका अध्यक्ष रमेश थोरात हे नेमकी कोणती भुमिका घेणार, नगरपंचायतीवर भगवा फडकवला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या आकस्मिक मृत्युने भाजपा समोरील अडचणीत वाढ झाली आहे. येत्या १५ तारखेला नगराध्यक्ष पदी नेमके कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक नगरसेवक फोडण्यात कोण यशस्वी ठरणार हे येणारा काळच ठरवेल.

bjp shivsena
वाईन विक्रीला विरोध करणारे अण्णा हजारे शेतकऱ्यांसोबत
bjp shivsena
''शिवभोजन केंद्रावरील गैर प्रकार खपवून घेणार नाही''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com