पान-२ मेन
वेध प्रभागाचा
---------------
प्रभाग क्र. १४
(यशवंतनगर, यशवंत पार्क, झापवाडी, वृंदावनगर, गंगोत्री, शिवशक्तीनगर, शांतीनगर, वीर सावरकरनगर)
प्रभागात उपनगरांचा विकास करण्याचे मोठे आव्हान
ब्लॅक स्पॉटने नागरिक हैराण; पुरेशा मूलभूत सुविधांचाही अभाव; घंटागाड्यांची अपुरी संख्या
संपत ढोली ः सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ९ ः पांडवनगरी ते शिवशक्ती नगरापर्यंत आणि वृंदावनगरच्या अर्ध्या भागापासून ते यशवंतनगरापर्यंतचा विस्तार प्रभाग क्रमांक १४ मध्ये आहे. नवीन प्रभाग रचनेत मूळ प्रभागाला वृंदावनगर, गंगोत्रीनगर, वीर सावरकरनगर, शिवशक्तीनगर ही उपनगरे जोडली आहेत. त्यामुळे नव्याने जोडलेल्या उपनगरांचा विकास करण्याचे मोठे आव्हान या प्रभागात आहे. पंधरा वर्षांपासून ही उपनगरे विकासापासून वंचित आहेत. सर्वाधिक कर भरणा करूनही विकासकामांसाठी प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बायपासजवळच्या ब्लॅक स्पॉटने नागरिक हैराण आहेत. दर आठवड्याला दोन टन कचरा येथे साचतो.
........
यशवंतनगर, यशवंत पार्क, शांतीनगर, झापवाडी भागात रस्ते, वीज, गटारी यासारखी बहुतांश कामे झाली आहेत. मात्र नव्याने जोडलेल्या वृंदावनगर, गंगोत्रीनगर, वीर सावरकरनगर, शिवशक्तीनगरात रस्ते, गटारी, वीज या सुविधांचा अभाव आहे. २०११ मध्ये या भागाचा समावेश नगर परिषदेत झाल्यापासून ही उपनगरे अस्तित्वात आहेत. मात्र मूलभूत सुविधाही येथे पुरेशा नाहीत. पावसाळ्यात तर या उपनगरांची अवस्था वाईट होते. प्रभागात तीन हजार ५०० कुटुंबाचे वास्तव्य आहे. मूळ शहरापेक्षा जास्त प्रमाणात या उपनगरांत भर भरणा होतो. परंतु, त्या प्रमाणात प्रशासनाकडून निधी मिळत नाही. दिवसेंदिवस ही उपनगरे विस्तारत आहेत. तसतशा समस्याही वाढत आहेत. प्रभागातील उपनगरांत विशेष निधी उपलब्धतेची गरज नागरिकांनी व्यक्त केली. घंटागाड्यांची संख्या अपुरी असल्याने कचरा संकलनाचा प्रश्नही येथे आहे.
या कामांमुळे नागरिकांत समाधान
जुना झापवाडी मार्गाचे काँक्रिटीकरण, वृंदावनगरातील आयुष्यमान मंदिर, यशवंदनगराला सुरू असलेले महादेव मंदिराचे काम यामुळे नागरिकांत समाधान आहे. नगरसेवक पंकज मोरे यांनी स्वखर्चातून बसविलेले सीसीटीव्ही, सर्वांत मोठा होणारा नवरात्रोत्सव, स्मशानभूमीच्या तुटलेल्या जाळ्यांचे सुरू असलेले काम लोकसहभागातून उभारलेली गणपती, महादेव मंदिर या कामांमुळे समाधान आहे.
.......
प्रभागासाठीचे नियोजित प्रस्ताव
- वृंदावननगर, गंगोत्रीनगरातील रस्ते, गटारी
- सिद्धार्थ खापरे ते धीरज गोरे घरापर्यंत रस्ता
- वृंदावनगरात अंगणवाडीची उभारणी
- घंटागाड्यांची संख्या वाढवून कचरा संकलन व्यवस्था
...........
--------------
नगरसेवक काय म्हणतात...
टप्प्याटप्प्याने विकासकामे
नव्याने जोडलेल्या उपनगरांत टप्प्याटप्प्याने सर्व विकासकामे होणार आहेत. निधी उपलब्धतेनुसार ही कामे पूर्णत्वास जाणार आहेत. सर्व सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
---- पंकज मोरे (नगरसेवक)
--------------
जुन्या उपनगरांत मूलभूत सुविधा
पंधरा वर्षांपासूनच्या जुन्या उपनगरांत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घंटागाड्यांची संख्या वाढवली जात असून, त्याद्वारे ब्लॅक स्पॉटवर नियंत्रण आणणार आहे.
---- ज्योती मोरे (नगरसेवक)
-----------
नागरिक काय बोलतात...
समस्या लागल्या मार्गी
यशवंतनगर परिसरातील सर्व समस्या मार्गी लागल्या आहेत. प्रतिनिधींकडून समस्यांची तातडीने दखल घेतली जात असल्याने प्रश्न सुटण्यास मदत होते.
----- प्रवीण झगडे (रहिवासी, यशवंतनगर)
----------
विकासाची अपेक्षा बाळगून
नव्याने जोडलेल्या उपनगरांत विकासकामे होण्याची अपेक्षा बाळगून आहे. प्रश्नांची दखल घेतली जाते. समस्या मार्गी लागून परिसरात बदल होईल, असे वाटते.
---- धीरज गोरे (रहिवासी, वृंदावननगर)
-----------
पान-२ मेन
(उद्याच्या अंकात - प्रभाग क्र. १५ – लिंगटांगवाडी, अपना गँरेज, तांबेश्वरनगर, डुबेरे नाका, भाटवाडी परिसर)
१) फोटो- 23463
सिन्नर ः जुन्या झापवाडी मार्गाचे झालेले काँक्रिटीकरण.
२) फोटो- 23465
सिन्नर बायपासवरील सरदवाडी पुलाजवळ असलेला ब्लॅक स्पॉट.
३) फोटो-23467
पंकज मोरे
४)फोटो- 23469
ज्योती मोरे
५)फोटो-23471
प्रवीण झगडे
६) फोटो- 23473
धीरज गोरे