Nashik Municipal Election
sakal
नवीन नाशिक: प्रभाग क्रमांक २७ अंतर्गत राजे छत्रपती संभाजी स्टेडियम येथे शुक्रवारी (ता. १६) सुरू असलेल्या निवडणूक मतमोजणीदरम्यान भाजपच्या उमेदवार प्रियांका दोंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आशा खरात यांचा पराभव केल्यानंतर मतमोजणीवरून वाद निर्माण झाला. पराभूत उमेदवार आशा खरात यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पवन दत्ता यांच्याकडे फेरमतमोजणी करण्याची मागणी केली.