Nashik Municipal Election
sakal
नाशिक: प्रभाग क्रमांक २७ ‘अ’मध्ये मतमोजणी प्रक्रियेत उमेदवाराने केलेली फेरमतमोजणीची लेखी मागणी कोणतेही ठोस कारण न देता फेटाळण्यात आल्याने लोकशाही हक्कांचे सरळ उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अन्यायाविरोधात अंबड येथील गौतमनगरवासीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत ‘फेरमतमोजणी झालीच पाहिजे’ अशी ठाम मागणी लावून धरली.