Nashik Municipal Election
sakal
इंदिरानगर: एबी फॉर्मच्या गोंधळामुळे शहरासह राज्यातील ‘हाय व्होल्टेज’ ठरलेल्या एका लढतींपैकी असलेल्या प्रभाग क्रमांक २९ मधील लढतीत अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी भाजपचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक यांचा सात हजार ७६९ मतांनी पराभव केला. शहाणे यांना १४ हजार २८४, तर बडगुजर यांना सहा हजार ५१५ मते मिळाली. प्रभागातील इतर तीन जागा भाजपला मिळाल्या.