पान दोन
-------------
आली दिवाळी लोगो घेणे
-----------------
15126
नाशिक : दिवाळीनिमित्त बाजारात विक्रीस आलेले पाण्यावर पेटणाऱ्या दिव्यांसह बटणावर पेटणारे एलईडी दिवे
पाण्यावर पेटणारे दिवे वेधता लक्ष
तेल, तूप आणि कापसाची बचतीमुळे मागणी
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. ३० : ‘दीपावली मनाई सुहानी, मेरे साई के हाथों में जादू का पानी...’ ''शिर्डी के साईबाबा'' चित्रपटातील या लोकप्रिय गीताची आठवण करून देणारा प्रत्यय आधुनिक तंत्रज्ञानामुळे यंदाच्या दिवाळी खरेदीत अनुभवास मिळत असून, पाण्यावर पेटणारे आणि बटणावर चालणारे दिवे दिवाळीच्या बाजारपेठेत नागरिकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.
दिवाळी हा दीपोत्सवाचा सण असून सर्वत्र विविध आकार व नक्षीकामाचे दिवे आणि आकाशकंदील पेटवून रोषणाई केली जाते. यात आता भर पडली ती अत्याधुनिक दिव्यांची. बाजारात घोटभर पाण्यावर पेटणारे आणि बटणावर चालू-बंद होणारे एलईडी दिवे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले आहेत. पाण्यावर चालणारे हे दिवे २५ रुपयांना एक, तर २४० रुपयांना डझन या दराने उपलब्ध आहेत. तसेच बटणावर पेटणारे एलईडी दिवे २० रुपयांना एक, तर २१० ते ४४० रुपयांपर्यंत (प्रकारानुसार) विक्री होत आहेत. पाण्यावर दिवे पेटण्याचे अप्रूप सामान्य नागरिकांसह विशेषतः चिमुकल्यांना भुरळ पाडत आहे.
हे दिवे वारंवार वापरता येऊ शकतील अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. घोटभर पाण्यावर दिवे पेटत असल्याने नागरिकांना घर आणि कार्यालय परिसरात आकर्षक रोषणाई करणे सोपे झाले आहे. यामुळे तेल, तूप आणि कापसाची मोठी बचत होत आहे. पारंपरिक मातीचे दिवे तुटण्याची भीती असते, मात्र हे अत्याधुनिक दिवे प्लॅस्टिकपासून बनवलेले असून ते न तुटणारे आहेत. एलइडी बल्ब, अत्यंत छोटी बॅटरी (सेल) आणि प्लॅस्टिकची पणती अशी या दिव्यांची रचना आहे.