निफाड- नगरपंचायत हद्दीतील थकीत घरपट्टी व पाणीपट्टीधारकांना वारंवार कर भरण्याबाबत जाहीर आवाहन केले. थकबाकीदारांना नोटीस देऊनही कर भरण्याकडे कानाडोळा होत असल्याने नगरपंचायतीने कर न भरणाऱ्या नागरिकांची नळजोडणी खंडित करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. .आत्तापर्यंत घरपट्टी ४९ टक्के वसूल झाली असून पाणीपट्टी ३३ टक्के वसूल झाली आहे. घरपट्टीची चालू मागणी व थकीत एकूण रक्कम सुमारे ८० लाख येणे बाकी असून पाणीपट्टीची चालू मागणी व थकीत असे एकूण रक्कम दीड कोटीच्या आसपास येणे बाकी आहेत. याचा परिणाम नगरपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावर व विकास कामांवर होत आहे. .त्या अनुषंगाने मुख्याधिकारी अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी (ता.१२) विशेष पथक नेमून आठ थकीत नळधारकांची जोडणी खंडित करण्यात आली. यापुढेही अशाप्रकारे नळ जोडणी खंडित किंवा मालमत्ता जप्तीची कारवाई होईल. यामुळे थकबाकीदारांनी त्वरित कराचा भरणा करावा तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शनिवार व रविवारीही नगरपंचायत कार्यालय सुरू राहणार आहे. सर्व मालमत्ताधारकांनी घरपट्टी व पाणीपट्टी तसेच व्यापारी संकुलाचे चालू व थकीत कर भरून नगरपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी निफाड यांनी केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.