पाण्याचा काटकसरीने वापर करा जलसंपदाची १५ गावांना लेखी सूचना

पाण्याचा काटकसरीने वापर करा   जलसंपदाची १५ गावांना लेखी सूचना
Published on: 
पान-४ SNR26B23005 कोनांबे ः देवनदीच्या उगमस्थानावर असलेल्या कोनांबे धरणातील पाणीसाठा. ---------------- ३६-४ उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरावा जलसंपदा विभागाचे सिन्नरमधील पंधरा ग्रामपंचायतींना पत्र सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.८ ः तालुक्यात अत्यल्प पावसामुळे उपलब्ध पाणीसाठे पुढील अकरा महिने टिकवून वापरावे लागणार आहेत. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करा, अशा सूचना जलसंपदा विभागाने केल्या आहेत. तशा आशयाचे पत्र १५ गावांना पाठवण्यात आले आहे. तालुक्यात यंदा पावसाची २५ टक्के तूट आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी साठे टिकवून ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. धरणांवर अवलंबून असलेल्या पाणीयोजना तग धरून राहण्यासाठी प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना सुरु केल्या आहेत. उपलब्ध पाणी साठे टिकवून ठेवण्याबरोबरच अवलंबून पाणीयोजना दीर्घकाळ सुरळीत चालाव्यात यासाठी गावस्तरावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतींनी आत्तापासून ग्रामस्थांना पाणी काटकसरीने वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा हेतू या मागे आहे. १६-१ या गावांना लेखी सूचना सरदवाडी धरणावर अवलंबून असलेली सरदवाडी, पास्ते, भाटवाडी, लोणारवाडी, उंबरदरी धरणावर अवलंबून असलेल्या ठाणगावसह पाडळी, टेंभरवाडी, हिवरे, पिंपळे, बोरखिंड धरणावर अवलंबून असलेले बोरखिंडसह शिवडे व पांढुर्ली, कोनांबे धरणावर अवलंबून असलेली कोनांबेसह सोनांबे, सोनारी या पंधरा गावांना लेखी पत्र देण्यात आले आहे. यात पाणी काटकसरीने वापरण्याची सूचना आहे. १६-१ पाणी योजना कशा चालविणार? धरणातील पाणी उपसा थांबवण्यासाठी अजून तरी जलसंपदा विभागाकडून सूचना आलेल्या नाहीत. तथापि, पाणी योजनांसाठी असलेले राखीव पाणी आँगस्ट २०२७ अखेरपर्यंत पुरवणे आवश्यक असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. असे असले तरी अवैध उपसा थांबवण्यासाठीही आत्तापासूनच उपाय योजना कराव्या लागणार आहेत. १६-१ धरणातील पाणीसाठा (दलघफू) ठाणगाव ः ४१.९० सरदवाडी ः ५९.५० बोरखिंड ः ४९.१० कोनांबे ः ४३.४० भोजापूर ः ३२४.९० ------------- कोट पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी आत्तापासून नियोजन केले जात आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. - बी. के. अचाट, शाखा अभियंता, जलसंपदा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com