लोकसहभागातून अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी

लोकसहभागातून अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी
Published on: 
टुडे पान ३ : ॲंकर ---- लोकसहभागातून जलताराची प्रभावी अंमलबजावणी व्हावी (उपशीर्षक) सीईओ करिश्मा नायर : भडगाव येथे जलसंधारण, पशुसंवर्धन उपक्रमांचा आढावा सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. ४ : जलसंधारण, भूजल पातळी वाढविणे आणि पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने जलतारा उपक्रम महत्त्वपूर्ण असून, ग्रामस्थांच्या लोकसहभागातून अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी करिश्‍मा नायर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी भडगाव तालुक्यातील क्षेत्रीय भेटीदरम्यान जुवार्डी गावात जलतारा उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती दिली. यावेळी जलतारा योजनेचे संस्थापक श्री. वायाळ यांच्या उपस्थितीत जलसंधारणाच्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी पंचायत समिती भडगावचे गटविकास अधिकारी के. बी. अंजने, सहायक आयुक्त डॉ. संदीप निकम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा कापसे, तसेच डॉ. विशाल गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जुवार्डी गावचे पी. ए. पाटील, रोजगार सेवक भूषण पाटील यांनी केले होते. जलसंधारण, लोकसहभागातून ग्रामविकास आणि पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील आहे. चौकट चारा टंचाईबाबत आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी पशुसंवर्धन विभागाच्या केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत गूढे येथे उभारण्यात आलेल्या सोजत गोट फार्मला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती जाणून घेत प्रक्षेत्रावर करण्यात आलेली चारा पिकांची लागवड आणि उत्पादनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील चारा उपलब्धतेबाबतही आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.