सिंचन प्रकल्पात सिंचन प्रकल्पात

सिंचन प्रकल्पात सिंचन प्रकल्पात
Published on: 
मेनफिचर टुडे पान एकसाठी ------------ (धरणाचे संग्रहित छायाचित्र वापरावे) --------- प्रकल्पातील साठ्यात गतवर्षीपेक्षा १६ टक्के घट -------- कपातीची अंमलबजावणी सुरू; पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी खरीप हंगाम वाया गेला आहे. दुष्काळी परिस्थितीसह पाणीटंचाईसह पाणी कपातीचे चटके आतापासूनच जाणवू लागले आहेत. सकाळी थंडी व दिवसभर उन्हाची तीव्रता याचा परिणाम सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठ्यावर झाला आहे. सिंचन प्रकल्पात गर्षापेक्षा यंदा १६ टक्के जलसाठा कमी आहे. आतापासूनच सिंचनासह पिण्याचे पाणी कपात लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात २०२४मध्ये एल निनोच्या प्रभावामुळे किमान ९० टक्के पर्जन्यमान होते. सिंचन प्रकल्पांच्या साठ्यांतदेखील समाधानकारक जलसाठे होते. बेमोसमी पावसामुळे टंचाई कमी प्रमाणात जाणवली होती. परंतु, यंदा राज्यासह खानदेशात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान असून, २०२४पेक्षा अत्यंत कमी म्हणजे ६० टक्के आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांत दुष्काळसदृश गंभीर परिस्थितीत आहे. रब्बीच्या पेरणीवर परिणाम सध्यास्थितीत जिल्ह्यातील ११२ प्रकल्पांमध्ये सरासरी ७९.६८ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे रब्बी पेरण्यांवर बऱ्याच प्रमाणात परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. चारा वाहतुकीवर परजिल्ह्यातून निर्बंध राज्य शाासनाने ३५०हून अधिक तालुक्यांत दुष्काळ घोषित करीत सर्वसामान्यांना मदत अनुदान जाहीर केले आहे. पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत दिवाळीपूर्वी दिली असून, रब्बी हंगामासाठी पशुधनासाठी चारा उत्पादनासाठी बियाणे अनुदानदेखील देऊ केले आहे. चाराटंचाई होवू नये, यासाठी परजिल्ह्यांत चारा वाहतुकीवर बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांत २०२५ मध्ये १४८०.११ दशलक्ष घनमीटरनुसार ५२.२६ टीएमसी अर्थात ९४.३२ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. त्यामानाने यंदा १५ टक्के जलसाठा कमी आहे. ---------- कोट शाासनाच्या सुचनांनूसार दुष्काळसदृश परिस्थिती पाहता, किमान ऑगस्ट २०२७पर्यंत जलसाठे पुरविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायतीतर्फे होणारा पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्याचे आदेश पालिकांना देण्यात आले आहेत. - जर्नादन पवार, प्रशासन सहआयुक्त, पालिका शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय. -------------- चौकट सिंचन प्रकल्पांतील जलसाठा असा धरणाचे नाव--जलसाठा टक्केवारीत हतनूर--९५.३७ गिरणा--९६.०१ वाघूर--६५.०८ मन्याड--४३.३८ बोरी-- ८८.३३ भोकरबारी-- ४७.१६ सुकी--९९.०६ अन्नावती--७०.६६ तोंडापूर--५१.७३ हिवरा--७७.३६ मंगरूळ--९७.३० बहुळा--७६.६० मोर--८९.२८ अंजनी--८०.७६ गुळ--७३.०५ शेळगाव बॅरेज-- ७९.९१ एकूण--७९.६८ टक्के ---------- चौकट पेयजल सिंचन आवर्तनात कपात दरवर्षी ऑक्टोबरअखेर वा नोव्हेंबरदरम्यान कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन त्यात तीन सिंचनाचे व चार पेयजलाचे असे आवर्तन निश्चिती केली जाते. परंतु, यावेळी प्रकल्प पूर्ण भरले असले तरी दुष्काळी टंचाईस्थिती लक्षात घेता ऑगस्ट २०२७पर्यंत उपलब्ध जलसाठे पुरविण्याचे नियोजन करण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार गिरणा प्रकल्पातून सिंचनासाठी एक व पेयजलाचे तीन असे चारच आवर्तन गिरणा प्रकल्पातून सोडण्याचा निर्णय आला आहे. ----- चौकट ‘हतनूर’मधून आवर्तन नाही यंदा दुष्काळामुळे हतनूर धरणातून सिंचनासाठी आवर्तन सोडले जाणार नाही, असे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडले जाणार नाही. पिण्यासाठीचे आवर्तन जिल्हाधिकारी सांगतील त्याप्रमाणात सोडले जाईल. म्हणून नागरिक व शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन हतनूर धरणाचे अभियंता शशिकांत चौधरी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.