Water Crisis : मालेगाव तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा! टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water Crisis
Water Crisisesakal

Water Crisis : शहर व तालुक्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या तापमानाबरोबर तालुक्यात पाणी टंचाई जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील टंचाईग्रस्त चार गावे व पाड्याची तहसीलदार नितीन देवरे, गटविकास अधिकारी भारत वेन्दे यांनी पाहणी केली.

पाहणी दौऱ्यात तालुक्यातील चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी आटले आहे. त्यामुळे लवकरच तालुक्यातील कजवाडे, सावकारवाडी, एरंडगाव, वऱ्हाणेला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे नितीन देवरे यांनी सांगितले. (Water Crisis Malegaon taluka is facing water shortage Water supply through tankers nashik news)

तालुक्यात महसूल व पंचायत समिती प्रशासन सातत्याने टंचाईचा आढावा घेत आहे. गतवर्षीची टँकरची संख्या पाहता या चार गावांना दररोज टँकरद्वारे पाणी पुरवावे लागणार आहे. ही चारही गावे वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जात आहे.

शासनाला या संबंधित गावांचे टँकर मागणी प्रस्ताव प्राप्त झाले आहे. पंचायत समितीने पाठविलेल्या प्रस्तावानुसार तहसीलदार नितीन देवरे यांनी प्रभारी गटविकास अधिकारी भरत वेन्दे यांच्यासह कजवाडे, रामपुरा, सावकारवाडी, एरंडगाव व वऱ्हाणे या गावांना दोन टप्प्यात भेट देत पाणीटंचाईचा आढावा घेतला.

या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्या आहेत. परिसरातील खासगी विहिरींनीही तळ गाठला आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Water Crisis
Unseasonal Rain Damage : कांद्यापाठोपाठ आता द्राक्ष उत्पादकही हतबल! उत्पादन खर्चही फिटेना

टंचाईग्रस्त गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणीटंचाई निवारणासाठी टँकरचा एकमेव पर्याय आहे. पाणीटंचाई पाहणीतील संयुक्त दौऱ्यात ही बाब निदर्शनास आली. संबंधित गावांच्या लोकसंख्येनुसार टँकर खेपाचे नियोजन करण्यात येत आहे.

त्यासाठी रामपुरा येथे विहीर अधिग्रहीत केली असून त्या विहिरीद्वारे या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जाईल. रोज एक १२ हजार लिटर क्षमतेच्या टँकरने दररोज एक फेरी करण्यात येणार आहे.

सावकारवाडीसाठी सहा फेऱ्या, एरंडगाव, वऱ्हाणेसाठी प्रत्येकी दोन फेऱ्या तर कजवाडेसाठी एक फेरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या गावांची पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने अहवाल पाठवून लवकरच या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल असे तहसीलदार नितीन देवरे यांनी सांगितले.

Water Crisis
Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी ठोकळवाडीचा टाहो! अमृत महोत्सवी वर्षातही महिलांच्या नशिबी संघर्षच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com