पंचवटी- म्हसरूळ शिवारातील कल्याणी सोसायटी, मेहरधाम येथे पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी (ता. २४) महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले.