धरणे, पाझर तलावांसह हक्काच्या पाण्याचे नियोजन हवे

धरणे, पाझर तलावांसह हक्काच्या पाण्याचे नियोजन हवे
Published on: 
फोटो - NSK26H31672 सुरगाणा : खुंटविहीर भागात पावसाअभावी करपलेली भातशेती. धरणे, पाझर तलावांसह हक्काच्या पाण्याचे नियोजन हवे --------------------------------------------- रोजगारासह आरोग्य, शिक्षण, रस्ते व दळणवळणाच्या सुविधांवर भर द्यावा रतन चौधरी, सकाळ वृत्तसेवा सुरगाणा, ता. ७ : पश्‍चिम वाहिन्या असलेल्या नद्यांमधून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी धरणे, तलाव आणि बंधाऱ्यांचे आतापासून नियोजन करण्याबरोबरच संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावनिहाय कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. बंद पडलेले पाझर तलाव व लघुसिंचन योजना पुन्हा सुरू करणे, हक्काचे पाणी मिळविणे, शेती-पशुधनासाठी चारा व पाण्याचे नियोजन आणि रोजगार हमीच्या कामांना गती देण्यासह आरोग्य, शिक्षण, रस्ते व दळणवळणाच्या सुविधांवरही भर देण्याची अपेक्षा आहे. डोंगर उतारावर वसलेली लोक वस्ती असल्याने देवळा, मोरडा, गळवड, शिरिषपाडा, म्हैसमाळ, दांडीचीबारी, कहांडोळसा आदी गावात जानेवारी ते फेब्रुवारीपासून पाणी टंचाईच्या झळा जाणवू शकतात. या साठी शासन स्तरावरून आताच गाव शिवारामध्ये असणाऱ्या जलस्रोतांचे सर्वेक्षण करायला हवे. तालुक्यात नार, पार, अंबिका, तान, मान, औरंगा, वाझडी, कावेरी, गिरणा या नद्यांची पाणी पातळी घटली असून आताच नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहेत. झरे, ओहोळ,नाले, पाझर तलाव, जलस्रोतांमध्ये कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जाणवतील असे चित्र दिसत आहे. पावसाअभावी पिके जळाली गतवर्षी पावसाने ४ मे पासून हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नियोजनाचे गणित चुकले होते. मात्र यावर मात करीत भात, नागली उत्पादक शेतकऱ्यांनी भाताचे सत्तर टक्के उत्पादन घेतले होते. या वर्षी पावसाने जून महिन्याच्या अखेरीस हजेरी लावल्याने भात, नागली, वरईची रोपे उशिराने टाकली होती, खरीप हंगाम पेरणीला उशीर झाला होता. त्यामुळे लागवड ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू होती. जेमतेम लागवड पूर्ण होताच १० ते १२ सप्टेंबरपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे भात, नागली, वरई ही पिके जळाली आहेत. दुग्धव्यवसाय संकटात तालुक्यातील पश्चिमेस डांग जिल्हा सीमावर्ती भागात गोंदुणे, रघतविहीर, चिंचले, केळीपाडा, कुकूडणे, उंबरठाण, काठीपाडा, चापावाडी, रघतविहीर, मांधा, गुही, करंजुल या भागात दूध उत्पादनात हळूहळू वाढ होत आहे. पावसाने एक ते दीड महिना अगोदरच दडी मारल्याने हिरवा चारा न मिळाल्याने दूध उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे. स्थलांतरात होणार वाढ आताच खरीप हंगामाची शेती मातीमोल झाल्याचे लक्षात येताच कामाच्या शोधार्थ तालुक्यातील सुमारे पन्नास टक्के मजूर वर्गाचे राज्याच्या पर जिल्ह्यात तसेच परराज्यात स्थलांतराचे प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. डाळिंबाच्या बागेवर काम करण्यासाठी गुजरात राज्यातील कच्छ, भूज कर्नाटक, राजस्थान तसेच सातारा, सांगली, पंढरपूर, सांगोला या भागात मजूर वर्ग स्थलांतर होताना आढळून येत आहेत. जानेवारीअखेर स्थलांतरात ऐंशी टक्के वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. या आहेत तालुकावासियांच्या अपेक्षा... - पश्चिम वाहिन्या नदीमध्ये वाहून जाणाऱ्या पाण्याचे आतापासून नियोजन करायला हवे. धरणे, तलाव, सिमेंट बंधारे याचे नियोजन करणे आवश्यक. - संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावनिहाय पाणी पुरवठा कृती आराखडा तयार करणे. - तालुका स्तरावर पाणी पुरवठा करण्याचे अधिकार देण्यात यावेत. - तालुक्यात १९७२ मध्ये दुष्काळात वन हरकतींमुळे बंद पडलेले ३२ पाझर तलाव तत्काळ मंजुरी देऊन सुरु करावेत. - तालुक्यातील लघु सिंचन योजनेचे सतखांब, मालगोंदा, सोनगीर यासह सर्वेक्षण झालेल्या लपाच्या योजनांना तातडीने मंजुरी देत साठवण तलाव बांधावेत. - पशुधनासाठी चारा, खाद्य, पाणी व्यवस्थापन नियोजन करणे गरजेचे. - खरीप पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. - जल जीवन मिशन योजनेच्या नळपाणी पुरवठा योजनांची पाहणी करून ठेकेदारांना कामे पूर्ण करण्यासाठी सूचना कराव्यात. - हातगडलगत असलेल्या कळवण तालुक्यातील धनोली प्रकल्पाचे मतदारसंघातील हक्काचे पाणी तालुक्याला मिळावे. - कळवण- सुरगाणा मतदारसंघातील अर्जुन सागरमधील हक्काच्या पाण्याचा वाटा सुरगाणा तालुक्याला देण्यात यावा. - तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी प्राथमिक ते पदवीपर्यंत माफ करावी. - दळणवळण, मोबाईल नेटवर्क सेवा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार हमी कामे, पर्यटन स्थळ विकास या सारखी कामे तालुक्यात सुरू करावीत. - तालुक्यात विजेचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर देण्यात यावा. - तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरु करण्यात यावी. - वनविभागाने वनराई बंधारे, रोप वाटीका, वनौषधी लागवड यासारख्या कामांचे नियोजन करावे. कोट... भात पिकांचे बियाण्यापासून ते लागवडीपर्यंत एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च करून संपूर्ण पीक जळाले आहे. खर्च निघणार नसल्याने १९७२ पेक्षाही भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. - महादू खोटरे, भात उत्पादक, पिंपळसोंड (NSK26H31673) कोट... या वर्षी सप्टेंबरमध्येच पावसाने पाठ फिरविल्याने भात पिके जळाली आहेत. दाणेच भरणार नसल्याने भात उत्पादन मिळणे तर दुरापास्त झाले आहे. त्यामुळे जगावे कसे असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला आहे. - शेवंती धुम, भात उत्पादक, पळसन (NSK26H31674) पावसाचे सरासरी पर्जन्यमान सन २०२५-२६ : १५४१:०६ मिमी सन २०२६-२७ : १४२२:०६ मिमी इन्फो... तालुक्यातील पशुधन गायी- २५४६५ म्हैस- ११६८१ वासरे- ५०६३ शेळी- १७५४३ मेंढी- ०६ एकूण - ५९७५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com