अशोक नगर मध्ये कमी दमाने पाणीपुरवठा : महिलांमध्ये संताप

अशोक नगर मध्ये कमी दमाने पाणीपुरवठा :  महिलांमध्ये संताप
Published on: 
प्रभाग १० मध्ये पाण्यासाठी हाल जलवाहिन्यांची गळती अन् नागरिक तहानलेले सातपूर, ता. २५ : अशोकनगर परिसरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही भागांत पाणी अत्यंत कमी दाबाने येत असल्याने महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबत महिलांनी संताप व्यक्त केला असून, मनपा पाणीपुरवठा विभागाने तातडीने लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. प्रभाग क्रमांक १० मधील राज्य कर्मचारी वसाहत, मॉडर्न शाळा परिसर, बंदावणे मळा यासह विविध भागांत कमी दाबाने पाणी येत असल्याने घरगुती वापरासाठी आवश्यक पाणी मिळणेही कठीण झाले आहे. घरांमध्ये पुरेसे पाणी साठवता येत नसल्याने पिण्याचे पाणी, स्वयंपाक व इतर दैनंदिन कामे करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी करंगळीसारखे पाणी येत असल्याने पाणी भरण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे महिलांचे दैनंदिन वेळापत्रकही विस्कळीत झाले आहे. एकीकडे नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना, दुसरीकडे परिसरातील अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. ---चौकट तक्रार करूनही दुर्लक्ष जलवाहिनीतील गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत असताना नागरिकांना मात्र पुरेसे पाणी मिळत नाही. याबाबत अनेकदा पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करूनही कोणतेही कारवाई केली जात नाही. महापालिका प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नगरसेविका इंदूबाई नागरे, राज्यश्री सुराशे, अलका बंदावणे, मनीषा बडे, मिना आभाळे, चंद्रकला पवार, पद्मा राऊत, छाया पठाडे, मीना बैरागी, सुनीता बोरसे, मोहिनी शिंदे, रोहिणी जंगम आदी महिलांनी केली आहे. ---कोट प्रभाग क्रमांक १० मध्ये अनेक ठिकाणी जुन्या २ इंची लाइन असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत मनपा विभागाकडे अनेकदा तर तक्रारही केली आहे. मनपा पाणीपुरवठा विभागाने पाहणी करून ६ इंच लाइन टाकल्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल. - इंदूबाई नागरे, नगरसेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com