जिल्ह्यात सर्वाधिक खोल-खोल पाणी येवल्याचेच..!

जिल्ह्यात सर्वाधिक खोल-खोल पाणी येवल्याचेच..!
Published on: 
पान-४ मेन-- चित्र वापरणे --------------- जिल्ह्यात सर्वाधिक खोल पाणी येवल्याचेच ------------- भूजल पातळीत ३.३० मीटरची घट; पावसाचे पाणी आडविण्यासाठी मोठ्या प्रकल्पांची गरज --------------- संतोष विंचू ः सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२२ : ब्रिटिशकालीन दुष्काळी शिक्का अन अवर्षणप्रवण असलेल्या येवल्याच्या भाळी टंचाई नवीन नाही. त्यातच मोठ्या जलसाठ्यांचा अभाव आणि पाण्याचा वारेमाप उपसा होऊ लागल्याने येथील भूजल पातळीत मोठी घट होत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक खोल पाणी येवल्याचेच झाले असून यावर्षी ५.४५ मीटरवर पाणी खोल गेले आहे. सरासरीच्या तुलनेत तब्बल ३.३० मीटरची घट झाली आहे. डोंगराळी आणि अवर्षणप्रवण तालुक्यात कितीही पाऊस झाला तरी पावसाचे पाणी उत्तर-पूर्व भागातून तापी खोऱ्याकडे आणि पश्चिमेकडून गोदावरीकडे वाहून जाते. त्यातच डोंगरगाव, खिर्डीसाठे आणि सावरगाव येथील पाझर तलाव वगळता मोठे साठवण तलाव नसल्याने तालुक्याला हक्काचा पाण्याचा आधार नाही. प्रत्येक उन्हाळ्यात ६० ते १०० च्या दरम्यान गावे, वस्त्या टंचाईग्रस्त होतात. अर्धा तालुक्यातच रब्बी पिकतो, परिणामी पाण्यासाठी प्रचंड प्रमाणात विहिरी आणि कुपनलिका खोदल्याने भूजल पातळीत अजूनच घट होताना दिसते. यंदा सरासरीच्या तुलनेत कमी झालेल्या पावसामुळे तालुक्याला पाणीटंचाईचा प्रचंड मोठा फटका बसला आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार, गेल्या ५ वर्षांच्या सरासरी स्थिर भूजल पातळीच्या तुलनेत तालुक्याची भूजल पातळी तब्बल ३.३० मीटरने खाली कोसळली आहे. ही घसरण जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये सर्वाधिक आहे. या तीव्र टंचाईमुळे विहिरी आणि कूपनलिकांचे स्त्रोत पूर्णपणे आटले असून विहीर खोदण्यावरही निर्बंध येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, ऐन पावसाळ्यानंतरही खरिपाचे पीक हातचे गेले आहे. भौगोलिकदृष्ट्या अवषर्णप्रवण क्षेत्रात येत असल्याने येथे दर काही वर्षांनी भूजलाचा अतिरिक्त उपसा होऊन पाणीटंचाईची पुनरावृत्ती होते.२०१५-१६ च्या दुष्काळात भूजल पातळी ४ मीटरपेक्षा जास्त खोल गेली होती. अशीही दरवर्षी दीड ते अडीच मीटरपर्यंत भूजल पातळीत घट होते. तालुक्याची भूजल पातळी सरासरी २.१६ मीटरची आहे. मात्र मागील महिन्यात सप्टेंबरमध्ये हीच पातळी ५.४५ मीटर घटल्याने तब्बल ३.३० मीटरची घट दाखवली जात असल्याने जमिनीत पाणीच नसल्याचे स्पष्ट होते. यामुळे तालुक्यासह उत्तर पूर्व भागातील सुमारे ५० हजार हेक्टरवर क्षेत्र ओस पडले आहे. १६-१ पातळी वाढीसाठी हवेत उपाय जमिनीत पाण्याचा अभाव आणि अमर्याद उपसा हे भूजल पातळी घटण्याचे मुख्य कारण आहे. शेतीसाठी सूक्ष्म सिंचनाचा (ठिबक) वापर न करता २५० मीटरहून अधिक खोलीचे बोअरवेल घेऊन पाण्याचा अमर्याद उपसा होतो. भविष्यातले संकट टाळण्यासाठी भौगोलिकदृष्ट्या योग्य ठिकाणी नवीन पाझर तलाव, लघु साठवण बंधारे आणि सिमेंट नाला बांध व्हावे, विद्यमान जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे आणि पाणी अडविण्याच्या संरचनांची दुरुस्ती यांना प्राधान्य द्यावे. पाणी वाहून जाणाऱ्या नैसर्गिक मार्गांवर लहान-लहान संरचनांची साखळी तयार करावी, जेणेकरून पाण्याचा प्रवाह नियंत्रित होऊन भूजल पुनर्भरणास मदत होणार आहे. १६-१ चौकट वर्षनिहाय भूजल पातळीची स्थिती - २०१४ - २०१५ : दुष्काळी परिस्थितीमुळे भूजल पातळी सरासरी ३ ते ४ मीटरने खाली गेली होती. - २०१६ - २०१८: सरासरी पाऊस समाधानकारक तरी उपसा वाढल्याने पातळी भूपृष्ठापासून ५ ते ६ मीटर खालीच स्थिरावली. - २०२० - २०२१ : चांगला पाऊस, लॉकडाऊन काळात उपसा कमी झाल्याने भूजल पातळीत तात्पुरती १.९ मीटरने सुधारणा. - २०२३ - २०२४ : जिल्ह्यातील सरासरी भूजल साठ्याने ५ वर्षांतील नीचांकी पातळी गाठली. तालुक्यात १ ते २ मीटरची अतिरिक्त घट होऊन पाणी पातळी ७ ते ८ मीटर पेक्षा खोल गेली. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com