पाणी, वीज समस्येवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा ट्रान्सफार्मर, दूषीत पाण्याचाही प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

पाणी, वीज समस्येवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा  ट्रान्सफार्मर, दूषीत पाण्याचाही प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
Published on: 
३६-३ जिल्हाधिकाऱ्यांशी पाणी, वीज समस्येवर चर्चा ------------ उगले ः ट्रान्सफार्मर, दूषित पाण्याचाही प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.११ ः खंडीत वीजपुरवठा, पाणी योजनेतील समस्या, स्टँबिलायझरचा प्रश्न, जन्म-मृत्यू नोंदीतील अडचणी, माळेगाव औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याचा प्रश्न, अपुऱ्या घंटागाड्या हे प्रश्न सोडविण्याची मागणी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली. नगर परिषदेत विविध समस्या जाणून घेण्यासाठी बैठक नुकतीच झाली. मुख्याधिकारी अभिजित कदम, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, आरोग्य सभापती ललिता हांडे, क्रीडा व शिक्षण सभापती कांताबाई जाधव, नगरसेवक ॲड. पंकज जाधव, सुदर्शन नाईक, विजय वरंदळ, बाळासाहेब उगले, नगरसेविका गीता वरंदळ, सुवर्णा उबाळे, मनीषा गवळी, दत्तात्रय हांडे, हरिभाऊ वरंदळ आदी उपस्थित होते. पाणीपुरवठा सुरळीत राहावा, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर होणारा परिणाम कमी व्हावा, तसेच ट्रान्सफॉर्मर आणि स्टॅबिलायझरशी संबंधित अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी उपाययोजना करण्याची मागणी उपनगराध्यक्ष देशमुख यांनी केली. आरोग्य सभापती हांडे यांनी जन्म-मृत्यू नोंदीतील विलंब टाळण्याची मागणी केली. ॲड. पंकज जाधव यांनी नियमित कचरा संकलन व्हावे यासाठी घंटागाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली. १६-१ कारखान्यांचे दूषीत पाणी चर्चेत माळेगाव एमआयडीसीतील दूषित सांडपाण्याचा प्रश्नावर हरिभाऊ वरंदळ यांनी प्रश्न उपस्थित केला. दूषित सांडपाण्याच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी औद्योगिक कंपन्या आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन दिले. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com