चांदोरी- गोदावरी नदीतील पाणवेलींच्या संकटावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी रविवारी (ता. २७) चांदोरी ग्रामपालिकेत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, भारतीय जैन संघटनेचे नंदू साखला यांच्या उपस्थितीत विशेष बैठक झाली. पाणवेली निर्मूलनासाठी विशेष कृती समिती स्थापन करण्यात आली असून, प्रत्यक्ष मोहीम येत्या १ मेपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.