वॉटर मीटरच्या सदोष जोडणीमूळे पाण्याची नसाडी

वॉटर मीटरच्या सदोष जोडणीमूळे पाण्याची नसाडी
Published on: 
टुडे १, मेन फिचर NSK26H34130 जळगाव : नळांना जोडलेल्या वॉटर मीटरमधून गळती होत असलेले पाणी. ...... NSK26H34129 गळती होत असलेल्या जलवाहिनीचे रस्त्यावर वाहणारे पाणी. --- सदोष मीटर जोडण्यांमुळे पाण्याची नासाडी शहरात ४० टक्के काम पूर्ण; कुठे जलवाहिन्यांना गळती, तर कुठे पाणीपुरवठाच बंद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : शहरात २४ तास पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवून ‘अमृत २.०’ योजनेंतर्गत नळजोडण्यांवर वॉटर मीटर बसविण्याची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, मीटर बसविण्याच्या घाईत जोडण्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी मीटर बसविल्यानंतर जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती सुरू झाली आहे. काही ठिकाणी मीटर उलटे बसविल्याने नळाला येणारे पाणीच बंद झाल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, महापौर दीपमाला काळे यांच्याकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली खिल्लारी कंपनीमार्फत शहरातील नळजोडण्यांवर मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. यासाठी कंत्राटदाराची सुमारे ३० ते ४० पथके कार्यरत आहेत. अयोध्यानगरातून सुरू झालेली ही मोहीम आता शहरातील विविध भागांत पोहोचली आहे. मात्र, मीटर बसविण्याच्या कामात पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. गणेश कॉलनी, जेडीसीसी बँक कॉलनी, नवीपेठ यांसह अनेक भागांत मीटरच्या जोडणीतून गळणारे पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याचे दिसून येत आहे. जोडणीतील त्रुटींमुळे भुर्दंड मीटर बसविताना पाइपची जोडणी व्यवस्थित न केल्याने अनेक ठिकाणी गळती सुरू झाली आहे. कर्मचारी घाईघाईने मीटर बसवून पुढील ठिकाणी जात असल्याने कामाची गुणवत्ता तपासली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही घरांमध्ये जागेअभावी मीटर घराबाहेर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. जोडणीतील गळती दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना खासगी प्लंबर बोलवावा लागत असून, त्यासाठी एक ते दीड हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. चौकट ९० हजार जोडण्यांवर बसविणार मीटर ‘अमृत २.०’ योजनेंतर्गत शहरातील सुमारे ९० हजार नळजोडण्यांवर मीटर बसविण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत १५ हजार मीटर बसविण्यात आले असून, आणखी ५० हजार मीटर महापालिकेकडे उपलब्ध आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे १०१.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. चौकट योजनेच्या उद्देशालाच हरताळ ‘जितका पाणीवापर, तितकेच बिल’ या तत्त्वानुसार पाण्याचा अपव्यय रोखणे हा मीटर बसविण्यामागील मुख्य उद्देश आहे. मात्र, मीटर बसवितानाच हजारो लिटर पाणी गळतीतून वाया जात असेल, तर योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रत्येक जोडणीची तपासणी करून सदोष जोडण्या तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.