esakal | गोदेची पातळी वाढली! गंगापूर, दारणा धरण समूहातून विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

Godavari River

गोदेची पातळी वाढली! गंगापूर, दारणा धरण समूहातून विसर्ग

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गंगापूर, दारणा दोन्ही धरण समूहातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांनी यंदाच्या मोसमातील पहिल्या पुराची आज अनुभूती घेतली.

गंगापूर धरणातील विर्सग वाढल्याने आज गोदावरी (Godavari River) तिराकाठच्या दोन्ही बाजूला पुराचे पाणी वाढले. दुथडी भरुन वाहणाऱ्या गोदावरीतील दुतोंड्या मारुतीच्या कमरेला सायंकाळी पाणी लागले. दुपारनंतर दर तीन तासांनी विसर्ग वाढविण्यात आला. दरम्यान जायकवाडी धरणातील ५८ टक्के साठा असून त्यात, ६५ टक्के पर्यत पाणी भरावे लागणार आहे. त्यामुळे गंगापूर दारणेसह नगर जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. गंगापूर ४००९, दारणा ७२००, कडवा २५४४, आळंदी ८०, वालदेवी १८३, तर नांदुर मध्यमेश्वर १६५८२ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.

हेही वाचा: गणेशोत्सव नाशिकच्या मराठी सेलिब्रिटींचा…!!

जायकवाडीत पाण्याचा वेग वाढला

नगर जिल्ह्यातील विविध धरतील विसर्ग बघता जायकवाडी धरणासाठी सरासरी ३२५९१ क्युसेसने पाणी सोडले जात आहे. गेल्या बारा तासापासून हा विसर्ग सुरु आहे. दरम्यान, चणकापूर ५२८६, हरणबारी २५८८, केळझर ११००, नाग्यासाक्या १०५, ठेगोडा ८३१६ क्युसेसने विसर्ग सुरु आहे. गेल्या १२ तासापासून जायकवाडीसाठी पाणी सोडले जात आहे. सध्या जायकवाडी धरणाची १५१३ .७८ फूट पाण्याची पातळी आहे. जायकवाडीत १२९८.४१ दलघमी (५९.७९ टक्के) पाणीसाठा आहे.

loading image
go to top