नांदगाव- यंत्रणेत संवाद व समन्वयाचा अभाव असल्याची झळ पाणी वितरण व्यवस्थेला बसली. परिणामी, शहर व ग्रामीण भागात पाण्याचा आवर्तन कालावधी लांबला. गिरणा धरणावरील नळपाणी पुरवठा योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही लाइनचे ब्रेकर नादुरुस्त झाल्याने आज दिवसभरात योजनेवरील वीजपुरवठा खंडित झाल्याने गिरणा धरणावरील उद्भव विहिरीतून पाण्याचा एकही थेंबाचा उपसा झाला नाही. परिणामी , न्यू पांझण येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचू शकले नव्हते.