जोरण धरणातील पाणी नियोजनासाठी शेतकऱ्यांशी संवाद समन्यायी पाणीवाटप आणि शेतीसाठी पाणी उपलब्धतेवर चर्चा; नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती

जोरण धरणातील पाणी नियोजनासाठी शेतकऱ्यांशी संवाद समन्यायी पाणीवाटप आणि शेतीसाठी पाणी उपलब्धतेवर चर्चा; नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती
Published on: 
पान दोन 13432 पिंपळपाडा : जोरण धरणातील पाणी नियोजनासाठी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधताना मंत्री नरहरी झिरवाळ, प्रांताधिकारी अप्पासाहेब शिंदे, विलास कड. उपलब्ध पाणी नियोजनबद्ध पद्धतीने वापरा मंत्री नरहरी झिरवाळ : जोरण धरणातील पाण्याबाबत चर्चा सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २ : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिंपळपाडा (पळसविहिर, ता. दिंडोरी) परिसरातील जोरण धरणातील उपलब्ध जलसाठा आणि पाणी नियोजनाबाबत अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोमवारी (ता. २) स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. उपलब्ध पाणी नियोजनबद्ध पद्धतीने वापरा असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. यावेळी शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, पाणीवाटपातील अडचणी आणि पाणीटंचाईमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी जोरण धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून त्याचा शेतीसाठी अधिकाधिक उपयोग व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. पाणीवाटप करताना येणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि सद्यःस्थितीतील पाणीटंचाईबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी झिरवाळ यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत उपलब्ध जलसाठ्याचे समन्यायी पद्धतीने वाटप करण्यासह शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याबाबत चर्चा केली. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपून आणि नियोजनबद्ध पद्धतीने वापरणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या सूचनांचा विचार करून योग्य उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी प्रांताधिकारी अप्पासाहेब शिंदे, विलास कड, संबंधित अधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.