Water Management : ओझर, जानोरी भागातील गावांमध्ये पाणी कपात; टंचाई भासू नये यासाठी नियोजन

water supply
water supplyesakal

Water Management : ओझरसह जानोरी, मोहाडी, साकोरे, जऊळके दिंडोरी आदी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनेमार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येत आहे.

याबाबत संबंधीत गावांतील सरपंच व ग्राम पंचायतींना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. (Water Management Water reduction in villages in Ozar Janori areas Planning to avoid shortages nashik news)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

water supply
Chandrakant Patil Controversy : चंद्रकांत दादा पाटील यांना थेट आव्हान देतोय हा 'शिवसैनिक'!

येत्या काळात पाणी टंचाई भासू नये, यासाठी हे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार आठवड्यातून एक दिवस या गावांना पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल, असे जीवन प्राधिकरणातर्फे दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आगामी काळात अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस उशिरा होण्याचे संकेत मिळताच जिल्हा प्रशासनाने पुढील काळात पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे ठरवले आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, प्रत्येक नळाला तोट्या बसवाव्यात, जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.

"अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. जून-जुलैमध्ये कमी पाऊस होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे हे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधीत गावांत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा."

-डी. आर. भामरे, उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

water supply
SAKAL Impact : पक्षी ‘रिटर्न मायग्रेशन'नंतर अभयारण्यात! पानवेली काढण्याच्या कामाला सुरवात, टायफा हटविणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com