धुळे ः टुडे ३ साठी
---
शेतातील सात मोटारी जप्त;
चोरीप्रकरणी चौघे ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ ः वरखेडी (ता. धुळे) शिवारातील शेतातून पाण्याच्या मोटारी चोरणाऱ्या चौघांना धुळे तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३१ हजारांच्या सात पाण्याच्या मोटारी जप्त केल्या. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
विलास श्यामराव पाटील यांच्या वरखेडी शिवारातील शेतगट क्रमांक ५५/४ मधील पत्र्याच्या शेडमधून १४ जुलैच्या सायंकाळी ते १५ जुलैच्या सकाळी पाण्याची मोटार व अन्य साहित्य चोरीला गेले होते. या प्रकरणाचा तपास करताना संशयित गणेश वसंत भिल (वय २४), सागर रणजित भिल (वय २२), सोमनाथ ऊर्फ अजय नाना भिल (वय २३) आणि आनंद हरी मोरे (वय २१, सर्व रा. वरखेडी, ता. धुळे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी परिसरातील शेतातून पाण्याच्या मोटारी चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, सहायक पोलिस निरीक्षक रविकुमार पवार, महिला पोलिस उपनिरीक्षक प्रभावती कापसे व पथकातील अंमलदारांनी ही कारवाई केली.