मालेगाव कॅम्प- चणकापूर-पुनंद धरणांमधून आवर्तन सोडण्यात आले आहे. सिंचन व पिण्यासाठीचे हे संयुक्त आवर्तन असल्याने विविध पाणीपुरवठा योजनांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. दोन्ही धरणांतील पाणी येथील गिरणा पुलापर्यंत आले आहे. याचा फायदा नदीकाठावरील चिंचावड, आघार खुर्द, आघार बुद्रुक, दाभाडी, पाटणे, टेहरे, मुंगसे, चंदनपुरी आदी गावांना होणार आहे.