चिचोंडी- नांदूरमध्यमेश्वर एक्स्प्रेस कॅनॉलद्वारे वैजापूर व गंगापूर तालुक्यासाठी सोडण्यात आलेल्या आवर्तनाच्या पाण्याला उग्र वास व मृत मासे पाण्यावर तरंगताना शनिवारी (ता. ३) आढळून आल्याने शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सदर पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून सोमवारी (ता. ५) अहवाल आल्यावरच सत्य उलगडणार असल्याचे बोलले जात आहे.