कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र पाणी आरक्षण नाही : महाजन

कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र पाणी आरक्षण नाही : महाजन
Published on: 
३६-२ कुंभमेळ्यासाठी पाण्याचे स्वतंत्र आरक्षण नाही मंत्री महाजन : मागणीनुसार आवर्तन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.३० : एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि काही गावांच्या मागणीनुसार पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत ध्वजारोहणासाठी अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार नाही, असे पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सांगत पाणी सोडण्यावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला. दरम्यान, सिंहस्थाच्या प्रमुख पर्वण्यांसाठी नऊ महिन्यांचा कालावधी शिल्लक असून सर्व विकासकामे वेळेत पूर्ण होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण तयारीसंदर्भात मंत्री महाजन आढाव्यानंतर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ध्वजारोहणाची तयारी पूर्ण झाली आहे. एकलहरे केंद्र तसेच चार ते पाच गावांच्या मागणीनुसार आवर्तन सोडले जाणार आहे. हे दरवर्षीप्रमाणे दिले जाणारे आवर्तन आहे. यंदाच्या वर्षीची परिस्थिती अधिक गंभीर आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यतचे नियोजन करण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. मंत्री महाजन पुढे म्हणाले, अंबडच्या दत्तनगरमधील प्रदूषित पाण्याचा प्रश्‍नावर महापालिकेने तातडीने पावले उचलून परिसरातील नागरिकांना मोफत नळाचे कनेक्शन उपलब्ध करुन दिले. औद्योगिक क्षेत्रासाठीचे एसटीपी लवकरच कार्यन्वित होणार असल्याने येत्या काळात गोदावरीची दुरवस्था दूर होईल. गंगापूर धरणातील चर खोदण्यासाठी नव्याने निविदा काढण्यात आली आहे. हा चर खोदल्यानंतर ६५० दलघफू पाणी वापरात येईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.